Top Post Ad

कृषी विधेयक विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन


कृषी विधेयक विरोधात काँग्रेस करणार धरणे आंदोलन

 

शहापूर
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या आदेशाने  व सुभाष कानडे प्रदेश उपाध्यक्ष, सुरेश टावरे जिल्हा अध्यक्ष ठाणे ग्रामीण यांच्या सूचनेनुसार "महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री" यांच्या जयंतीनिमित्त  केंद्राने शेतकऱ्यांच्या विरोधात पारित केलेल्या तीन कृषी विधेयकांच्या विरोधात २ ऑक्टोबरला 'किसान मजदूर बचाव दिन' पाळला जाणार असून या तिन्ही  विधेयकांच्या विरोधात शहापुर तालुका काँग्रेस कमिटीच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा सोशल मीडियाचे जिल्हा अध्यक्ष महेश धानके यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले आहे.

 

     नुकताच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात कोणत्याही प्रकारे चर्चा न करता शेती व शेतकरी देशोधडीला लावणारे,भांडवलदार हिताची तीन विधेयक मंजूर करण्यात आली आहेत,ही विधेयक मागे घेण्यात यावीत म्हणून हे धरणे आंदोलन करण्यात येणार असून सोशल डिस्टन्स चे पालन  करून आम्ही आमचा निषेध व्यक्त करू असेही महेश धानके यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.    शहापूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे   दिनांक २ ऑक्टोबर २०२० रोजी  सकाळी ११ वाजता काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर सोशल डिस्टन्स पाळून हे  धरणे आंदोलन करण्यात येणार असून तालुक्यातील जिल्हा तालुका पदाधिकारी, फ्रंटल चे अध्यक्ष व पदाधिकारी, शहर व विभागीय अध्यक्ष ,तालुका कार्यकारी सदस्य  यात सहभागी होणार आहेत,तसेच काँग्रेस तर्फे राष्ट्रपतींना दोन कोटी सह्यांचे निवेदन देण्यात येणार असून या अभियानाचा शुभारंभही यावेळी करण्यात येणार आहे असे ही बोलतांना महेश धानके यांनी सांगितले.


 

  टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1