Top Post Ad

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता अद्यापही प्रलंबित

आरोग्य कमँच्यार्यांना मिळणारा प्रोत्साहन भत्ता अद्याप हि प्रलंबित? 
कंल्याण-डोंबीवली महानगरपालिका वैद्यकीय अधिकार्यांचे दुलँक्ष? 


 


कल्याण
शासनाने कोवीड १९ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७ दि १३/३/२०२०पासून लागू करण्यात आला आहे.  नवी मुंबई आणि बृहनमुबंई महानगरपालिका यांनी कमँचार्यांना प्रोत्साहन भत्ता त्यांच्या मासिक वेतनात देण्यात आलेला आहे.  मात्र कंल्याण-डोंबीवली महानगरपालिका अंतर्गत आरोग्य अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कमँचार्यांना सदर भत्ता अद्यापहि प्रलंबित आहे. तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना प्रतिदिन देण्यात येणारा ३००रु प्रोत्साहन भत्ता नेमका कुठे गेला? याचाही थांगपत्ता नाही. या संदर्भातील विनंतीपर निवेदनपत्र डॉ.तृणाली महातेकर,सौ संगीता हंडोरे, रविराज गायकवाड, सौ सुवणाँ चौधरी, सौ मिरा हणमंते, सौ मिरा काळे, सौ माया गडसे, आदि कमँचारी वगाँने वैद्यकीय अधिकारी यांना दिले असून त्या संदर्भातील निर्णय अद्याप घेण्यात आला नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.


कं डो म पालीकेतील नियमित सेवेतील तसेच अत्यावश्यक सेवेतील कायम अधिकारी/ कमँचारी तसेच करार पध्दतीवरील कमँचारी जोखीम पत्करून कामावर हजर राहून त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडत आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ६७सी नुसार तातडीच्या परिस्थितीत जनतेच्या सेवेसाठी किंवा सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना व खचँ करण्याचे अधिकार त्या, त्या महानगरपालिका आयुक्त यांना असल्याची तरतुद आहे त्यानुसार दि १३/३/२०२० ते  १४/४/२०२० या कालावधीत कायँरत अधिकारी /कमँचारी यांना त्यांच्या उपस्थितीनुसार विशेष भत्ता रू ३०० प्रतिदिन या प्रमाणे अदा करण्यात शासनाच्या वतीने दि ७/४/२०२०प्र,क्र५७४/९३९ २०२०च्या परिपत्रकान्वये मान्यता देण्यात आली आहे परंतु उपरोक्त आदेश कं, डो, म, प यांनी अमलात आणलेला नाही याबद्दल अद्याप अस्पष्टता आहे.


कं, डो, म, पालीकेतील आरोग्य विभागाने आपत्कालिन काळात नवीन भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती परंतु त्या भरती प्रक्रियेत हि पालिकेचा सावळा गोंधळ उघडकीस आला आहे नवीन भरती प्रक्रियेत ए, एन, एम यांना २५००० रू वेतन आणि जूने ए, एन एम, एन ,यु,एच,एम,अंतगँत फक्त १८००० तसेच जूने व नवीन सफाई कामगार यांच्या वेतनवाढ मधील एवढी मोठी तफावत असल्याबाबत अद्यापही स्पष्टता नाही.   त्याचबरोबर कोरोना काळात आपत्कालीन परिस्थितीत कायँरत असणारे कमँचारी यांना जर कोरोनाची लागन झाल्यास त्यांना ईतर रुग्णालयात रूग्णांसोबत उपचार घ्यावे लागतात पण असे न करता त्यांच्यासाठी औषध उपचार व स्पेशल हाँस्पीटलची सोय करावी आणि त्यांच्यासाठी विमा कवच उपलब्ध करून देण्यात यावे कं, डो, म, पालिकेने तसेच वैद्यकीय आरोग्य विभागाने संगनमताने दखल घेऊन त्या बाबतीत तात्काळ योग्य निर्णय जाहीर करावे अशी मागणी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com