हे तर महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्यांचे षडयंत्र

हे तर महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्यांचे षडयंत्र

कंगनाची सख्खी बहीण रंगोली राणावत-चंदेलवर तिच्याच स्वत:च्या राज्य हिमाचल प्रदेशच्या देहरादून मध्ये  चेह-यावर अँसिड अँटक झाला , तेंव्हा कधी हिमाचल असुरक्षीत वाटला नाही की हिमाचल पोलिसांच्यावर तिने चिखलफेक केली नाही,
२००५ ला मुंबईत फिल्मी करियरसाठी आली ,मुंबईने तिला नाव प्रसिद्धी पैसा सर्व दिलं ,त़ी मुंबई कालपर्यंत चांगली होती,
आज तिच्या समर्थनार्थ उतरलेल्या  करणी सेनेने तिला राणी लक्ष्मीबाईचा अपमान केला मागच्याच वर्षी तिला धमक्या दिल्या होत्या  तेंव्हा याच मुंबई पोलिसांनी तिला संरक्षण दिलं.... आणि आज असं अचानक काय झालं की तिने ..स्कॉटलंड यार्डनंतर जागतिक क्रमवारीत टॉप  मुंबई पोलिसांवर टीका केली ?


मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली, याचं कारण परवा सापडलं, ते म्हणजे ..तिला गृहमंत्री अमित शहांकडून दिलं गेलेलं वाय दर्जाचं पोलिस संरक्षण ! खरं म्हणजे मुबंई गुजरातला पाहिजे होती म्हणून तत्कालिन गुजराती मुख्यमंत्री मोरारजी देसाईने गोळीबाराचा आदेश दिला परिणामी *१०६ मराठी आंदोलक हुतात्मे झाले, मराठी माणसांनी रक्त सांडून मुंबई मिळवलीय !  तेंव्हापासून अमराठी नेते /मीडियामार्फत कोणत्या ना कोणत्या कारणाने मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यात येत आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान ती कोणाच्या पाठिंब्यावर करीत आहे, हे सर्वांना कळले,  मराठी अस्मिता ज्वलंत असणाऱ्या, सामान्य माणसांनी ,कलाकारांनी, सर्वपक्षीय नेत्यानी कंगनासह अर्नब रॉयचा निषेध केला !
*अपवाद होता..फक्त भाजपचा !
वरून भाजपाई कांगावा करताहेत, काय तर म्हणे !  एक महिलेबरोबर शिवसेनेनं असं वागायला नको वगैरे ,वगैरे...!


अरे !....ती कंगना बाहेरच्या राज्यातून मुंबईत येते इथं खाते आणि नावं ठेवते ?
स्वत: ड्रग अँडिक्ट असल्याचे आणि बीफ ( गोमांस ) खात असल्याचे तिने मुलाखतीत सांगितले होते..
मुळात कंगनाने सुरुवात केलीय
मुंबईची तुलना POKशी केल्यानंतर प्रतिक्रिया म्हणून खा.संजय राऊत आणि गृहमंत्री अनिल देशमुखांनी  तिला मुंबई पाकव्याप्त काश्मीर वाटत असल्यास तिने राहु नये अशी अस्मितादर्श प्रतिक्रिया दिली तर काय चुकले ?
*पुन्हा तीच मुद्दाम मराठी अस्मितेला      चिथावणी देते,
किसी के बाप की हिंमत है, मुझे मुंबई मे आने से रोकने की ?  (बाप काढला..)
जो उखाडना है वो उखाड लो !....... ही काय भाषा झाली ?
ती महाराष्ट्राचा एवढा अपमान करीत असताना, *निर्लज्जपणे केंद्र सरकार सह महाराष्ट्रातील भाजप महाराष्ट्रद्रोही कंगनाला पाठिंबा देतंय  भाजपला मराठी माणूस माफ करूच शकत नाही


एsssउद्धव ठाकरे ! सुन ले !!   ( अर्नब रॉय )
"उद्धव ठाकरे तुझे क्या लगता है"  ( कंगना राणावत)
मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा असो !  त्यांचा सन्मानच केला गेला पाहिजे कारण मुख्यमंत्री हे संवैधानिक ,संस्थात्मक प्रमुख पद असते,त्यांचा अपमान हा समस्त राज्याचा अपमान असतो.  त्यांचा उल्लेख एकेरी करण्याची हिम्मत अर्नब रॉय किंवा कंगना करतातच कशी ? सत्तास्थापन करता आली नाही आणि शिवसेना सत्तेत आहे म्हणून सरकार पाडण्यासाठी .. राज्यपालाला हाताशी धरून सरकार अस्थिर करण्याचे सातत्याने प्रयत्न सुरूच आहेत, 

कंगनाचा बांधकाम आत्ताच कसं पाडलं ?  असे प्रश्न विचारणा-या भाजपने ,
गुजरातमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत सर्व मार्गाचा अवलंब करीत फोडाफोडी सुरू केल्याने, सुरक्षिततेसाठी 
कॉंग्रेसने त्यांच्या आमदारांची हॉटेलवर सोय केली म्हणून कर्नाटकचे तत्कालिन मंत्री डी शिवकुमार यांच्यावर ..CBIच्या धाडी टाकल्या ,  अनेक राज्यात ..विरोधी राजकारण्यांची तथ्य नसलेली प्रकरणे उकरून ईडी, गोदीमीडिया ,सीबीआय मागे लावताना ../ आत्ताच कसं ?  असा प्रश्न Party with Difference वाल्या भाजपाई भक्तांना पडत नाही ?
शिवाय सुशांत कंगनाच्या निमित्याने  राज्यात बेबंदशाही सुरू असल्याचे भासवून बिकाऊ मेडीयाला हाताशी धरून देशभरात महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्यांचे षडयंत्र, जमल्यास राष्ट्रपती राजवट  लादता येईल का ?  ही चाचपणी  कंगनाच्या खांद्यांवर बंदुक ठेवून महाराष्ट्रद्रोही राजकारण सुरु आहे ! - ( महेंद्र थोकले )


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या