शहापूरात बिबट्याची शिकार करणारे गजाआड

शहापूरात बिबट्याची शिकार करणारे गजा आड ; वन विभागाची धडक कारवाई

 

शहापूर

 

कोरोना महामारीत अनेक अवैध उद्योग धंद्यांना उधाण आले असून मंगळवारी शहापूर वन विभागाकडून केलेल्या कारवाईत बिबट्यांची तस्करी करण्याऱ्या चार आरोपींना गजाआड केले आहे. शहापूर वन विभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी खर्डी याना मंगळवारी (दि. ७) मिळालेल्या माहिती नुसार परिमंडळ दापुर हद्दीतील मौजे दापुर येथील आरोपी दादू शंकर सर्पे राहणार दापुर यास बाबट्यांची शिकार प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने सहाययक वनसंरक्षक शहापूर यांचे समक्ष शिकार केल्याचे कबूल केले

 

बिबट्याची नखे  आरोपी  सुभाष वसंत वाघचौडे राहणार शिरोळ यांना विकल्याचे कळविले त्यानंतर सुभाष वसंत वाघचौडे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता सदर बिबट्यांची नखे आरोपी  गौतम बाळू उबाळे व अविनाश रामचंद्र भालेराव यांना विकल्याचे सांगितले. आरोपी  गौतम बाळू उबाळे व अविनाश रामचंद्र भालेराव राहणार शहापूर यांच्या घराची झडती घेऊन बिबट्याची नखे हस्तगत करण्यात आली उपरोक्त सर्व आरोपींविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ तसेच वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपींना अटक करण्यात आली. सदरची कारवाई व्ही. टी. घुले, उपवनसंरक्षक शहापूर यांचे मार्गदर्शनाखाली पी. एस. देशमुख वनपरिक्षेत्र अधिकारी खर्डी, एम. एस. बोठे वनपरिक्षेत्र अधिकारी वाशाळा पी. आर. चौधरी  वनपरिक्षेत्र अधिकारी शहापूर व  वनकर्मचारी वनपरिक्षेत्र खर्डी यांनी केली असून  आरोपींना बुधवारी ८ जुलै रोजी प्रथम वर्ग न्यायालय शहापूर यांचे समक्ष उपस्थित करण्यात आले असता न्यायालयाने  आरोपींना एक दिवसाची वनकोठडी सुनावली असून गुन्ह्याचा   अधिक तपास आर. एस. पाटील सहाय्यक वनसंरक्षक शहापूर हे करीत आहेत

 


 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1