Top Post Ad

विद्यार्थी भारतीची ऑनलाईन लेक्चर बंद करण्याची मागणी




विद्यार्थी भारतीची महाविद्यालयातील ऑनलाईन लेक्चर बंद करण्याची मागणी

 

ठाणे     

                  

कोरोनाच्या महामारीच्या काळात आज भारताची स्थिती दिवसेंदिवस बिघडते आहे . सर्वच क्षेत्रातील लोकांची परिस्थिती हालाखीची झाली असून सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचे खच्चीकरण झाले आहे .  अनेक विद्यार्थ्यांच्या घरामध्ये आई, वडील, भाऊ, बहीण , आजी , आजोबा सगळेच कोरोनाच्या विळख्यात अडकले गेले आहे  त्यात काहीच्या घरात तर खायला दोन वेळचे जेवण मिळेल की नाही इथं पासून मारामारी सुरू आहे . एकीकडे आर्थिक दुष्काळ थैमान घालत आहे. पैशाची आर्थिक चणचण मोठयाप्रमाणात निर्माण झाली आहे . त्यामध्येच सध्याच्या काळात अनेक महाविद्यालयात ऑनलाईन लेक्चर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे अशा सर्वच परिस्थिती मुलांनी हे लेक्चर कसे अटेंड करायचे. असा प्रश्न विद्यार्थी भारती राज्यध्यक्षा मंजिरी धुरी यांनी मांडला आहे  ही ऑनलाईन लेक्चर पद्धती रद्द करण्याची मागणी ईमेलच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्याकडे केली आहे. 

     सर्वच विद्यार्थ्यांनाकडे अँड्रॉइड मोबाईल फोन्स नाही. मोबाईल मध्ये लागणारे 300 रुपयाचे नेट पॅक चे रिचार्ज मुलांना शक्य नाही. बऱ्याच विभागांमध्ये नेटवर्कचा आताच्या काळात देखील पत्ता नाही. गावाकडच्या विद्यार्थ्यांना तर हे अजिबातच शक्य नाही. नॉर्मल कॉल लावण्यासाठी सुद्धा त्यांना मोठा प्रयत्न करावा लागतो मग तर लेक्चर ऑनलाइन अटेंड करणं शक्य नाही. बरेच विद्यार्थी कोरोनाच्या काळात सामाजिक कामात उतरले आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या घरात कोरोनाग्रस्त आई , वडील आजी आजोबा आहे. आर्थिक चणचण मोट्या प्रमाणात आहे. त्यातच लाईट कधी जाते येते तर कधी कधी दोनदोन दिवस लाईट नाही अशी अवस्था आहे. अशा बऱ्याच अडचणी असताना विद्यार्थी ऑनलाईन कसा शिकणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. 

            या सर्व गोष्टींच्या अडचणी सरकार ने आजच्या काळात समजून घेणं खूप गरजेचं आहे. कोरोनाची परिस्थिती पूर्णतः संपुष्टात आली की मगच विद्यार्थ्यांना चे लेक्चर सुरू करण्यात यावे आता च्या काळात हा निर्णय अंत्यत चुकीचा आहे आगोदर ऑनलाइन शाळा सुरू केल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत त्यात विद्यार्थ्यांनसमोरच्या अडचणी आपण वाढवल्या नाही पाहिजे व सर्वसमावेशक असा निर्णय घेण्यात यावा .  असे मत विद्यार्थी भारतीचे राज्यकार्याध्यक्ष प्राणय घरत, कार्यवाह श्रेया निकाळजे, संघटक शुभम राऊत, प्रवक्ता अर्जुन बनसोड व सचिव जितेश पाटील यांनी मांडले आहे

 



 

 



 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com