राज्यात `पुनश्च लॉकडाऊन'
मुंबई
राज्यभरात झपाट्याने वाढणाऱया रुग्णसंख्येमुळे `पुनश्च हरिओम' ऐवजी `पुनश्च लॉकडाऊन' वाढवण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे. मुंबईसह राज्यात पुन्हा लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. पूर्वीप्रमाणे एसटी, मॉल, हॉटेल, थिएटर बंदच राहणार आहेत. तसेच सोशल डिस्टन्सचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक करण्यात आले आहे.
केंद्र सरकारनेही नवी नियमावली जारी केली. त्यानुसार शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लास 31 जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. मात्र दुस्रया राज्यात जाण्यासाठी परवानगी अथवा पासची गरज नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रशिक्षण संस्था 15 जुलैपासून काम सुरू करू शकतील. दुचाकीवर पूर्वीप्रमाणे चालवणारा एकटाच जाऊ शकणार आहे. रिक्षा, टॅक्सीमध्ये चालक अधिक दोन व्यक्ती प्रवास करू शकतील. बस आणि एसटीमध्ये क्षमतेच्या 50 टक्के प्रवाशांना प्रवेश असणार आहे. वृत्तपत्र घरोघरी टाकण्यास संमती आहे. पार्लर आणि सलून चालू ठेवता येतील. हॉटेल्समधून होम डिलिव्हरीस तसेच बांधकामे चालू ठेवण्यास संमती आहे. कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असलेल्या मुंबईसह एमएमआर परिसरात तसेच पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर महापालिका परिसरात मिशन बिगिन अगेन पहिल्या टप्प्यांतर्गत दिलेल्या शिथिलताही सुरू राहतील. परंतु निर्बंध असणार आहेत.
ग्रामीण भागात सामूहिक नेतृत्वामुळे संसर्ग आटोक्यात आहे. शहरात ते शक्य नाही. परिणामी सध्या तरी लॉकडाऊनला पर्याय नाही हे मानले तरीही लॉकडाऊनमुळे लोक त्रस्त आहेत. आर्थिक फटका बसतो आहे. पण त्याला नागरिकच जबाबदार आहेत. नियम न पाळण्राया बेफिकीर नागरिकांमुळे प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे लोकांनीच पुढाकार घेऊन लक्ष ठेवावे. यावर लॉकडाऊन उत्तर नाहीच, आरोग्य सुविधा वाढवायला हव्यात.असे मत मुंबई विद्यापीठातील कोरोना साथीचे अभ्यासक,अर्थतज्ञ व प्रा. डॉ. नीरज हातेकर यांनी व्यक्त केले.
0 टिप्पण्या