आदिवासी दिनावरही कोरोनाचे सावट
दरवर्षी ९ ऑगस्ट हा दिवस अगदी उत्साहात, आनंदात आपण जागतिक आदिवासी दिन म्हणुन साजरा करतो, ठिकठिकाणी मिरवणुका काढतो, आदिवासी कला, तारपा नृत्य, तुरनाच, गौरी नाच, ढोल नाच, बोहड्यातील सोंग, देखावे, यासारखे आदिवासी संस्कृतीचे देखावे आपण मिरवणुकीत काढतो, हजारोंच्या संख्येने मिरवणुकीत आपले बांधव जमतात व समाजाची एकजुट दाखवतात, समाज जागृत होतो त्याचा आम्हाला अभिमानच आहे परंतु चालु वर्षी कोरोना वायरसचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता आपआपल्या घरीच साध्या पद्धतीने आदिवासी दिन साजरा करावा असे आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे आदिवासी बांधवांना आवाहन केले आहे.
जगभरात कोरोनाने हाहाकार घातला आहे, अजुनही कुठल्याच देशाला कोरोनावर लस शोधण्यास यश आलेले नाही, या कोरोना माहामारीपासुन लांब राहण्याचे साधे उपाय म्हणजे, घरीच रहा, सुरक्षित रहा, सोसल डिस्टेटिंग (सुरक्षित अंतर ठेवणे) पाळले, हात सँनिटायझर किंवा साबणाने स्वच्छ धुवा, बाहेर पडताना तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधणे, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. यासारखे नियम शासनाने नागरीकांना पाळायचे आवाहन केले आहे, आज भारत देशात कोरोनो रुग्णाची संख्या ही जवळजवळ ९ लाखाच्या वर आहे, तर आजपर्यत मृतांची संख्या ही २३ हजाराच्या वर एवढी आहे,
संपुर्ण देशात परिस्थिती अतिषय गंभीर आहे, शहरी भागापासुन आता कोरोनाने ग्रामीण भागात शिरकाव केला आहे, ग्रामीण भागात पण कोरोना चे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, जर का या दिवशी रँलीचे नियोजन केले तर हजारो समाज बांधव उपस्थित राहतील व त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, या सर्व परिस्थितीचा विचार करता या वर्षी ९ ऑगस्ट जागतीक आदिवासी दिन हा आपल्या घरी, गावात साध्या पद्धतीने जास्त गर्दी न करता शासनाच्या नियमांचे पालन करुन साजरा करावा व शासनाला निवेदन देताना किंवा मागणी करताना प्रत्येक संघटनेचे ४ ते ५ प्रतिनिधी जातील याची सुद्धा काळजी घ्यावी, आदिवासी दिन साजरा करण्यास विरोध नाही करत, फक्त चालु वर्षी कोरोना वायरसचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता साध्या पद्धतीने आपआपल्या घरीच ९ ऑगस्ट जागतीक आदिवासी दिन हा साजरा व्हावा हेच समाज बांधवांना संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या