वित्त विभागाकडून वृद्ध कलावंतांचे हा थकित मानधन देण्यासाठीचा निर्णय
कोल्हापूर
राज्यात कोविड मुळे उद्भवलेल्या संकटात कलावंताच्या थकीत मानधनाचा प्रश्न निर्माण झाला होता. वृद्ध कलावंतांच्या अनेक शिष्टमंडळाने भेट घेऊन ही व्यथा सांस्कृतिक मंत्री राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे मांडली होती, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे माध्यमातून वित्त विभागाकडून वृद्ध कलावंतांचे हा थकित मानधन देण्यासाठीचा निर्णय घेतला असल्याचे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले,
पहिल्या टप्प्यातील दोन महिन्यांचे थकीत मानधन येत्या आठवड्यात कलावंतांच्या खात्यात जमा होणार आहे. कोविड काळात आता जवळपास 28800 कलावंतांना यामुळे दिलासा मिळणार असून याबाबत महाविकास आघाडी सरकारचे कलावंत संघटनेचे पदाधिकारी व अनेक वृद्ध कलावंतांनी आभार मानले आहेत. शासनातर्फे राज्यातील वृद्ध कलावंतांना मासिक मानधन देण्याची योजना राबविली जाते. स्वतःच्या कलेने लोकांचे मनोरंजन करणाऱ्या कलावंतांना वृद्धापकाळात कलेचे सादरीकरण शक्य होत नाही मात्र कला हीच त्यांची उवजीविका असल्याने कलावंतांचे वय झाल्यावर अनेक प्रश्न निर्माण होतात.
0 टिप्पण्या