शहापूरात मुहाच्या फुलांची दारु तर बियांचा खाद्यातेलासाठी वापर
शहापूर
एकिकडे गावठी दारु बनविण्यासाठी मुहाच्या फुलांचा वापर होत असताना दुसरीकडे याच मुहाच्या झाडाच्या बीयांपासून तेल गाळून ते खास खाद्यासाठी वापर करण्याची परंपरा शहापूरच्या आदिवासी समाजाने जपली आहे .या तेलाला आयुर्वेदिक महत्व असल्याने मुहाच्या तेलाला प्रचंड मागणी आहे.तर मुहाच्या फुलांच्या दारुला आदिवासींची पसंती असल्याने उन्हाळ्यात मुहाची झाडाची फुलं गोळा करुन ती उन्हात वाळवून त्याची नंतर गावठी दारु बनवली जाते ही मुहाची दारु ग्रामीण भागात आदिवासी गाव पाड्यांवर प्रचंड अशी लोकप्रिय आहे.मद्यपींकडून खास मुहाच्या दारुला मोठ्या प्रमाणावर मागणी असते.परंतु हे गावठी दारुचे धंदे अवैध असल्याने अगदी छुप्या पध्दतीने दारुअड्डयांवर मुहाची दारु ग्रामीण भागात विकली जात आहे. तर मुहाच्या बियांपासून तेल गाळण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांची पावसाळ्यात लगबग दिसत आहे. तालुक्यातील दऱ्या खोऱ्यात वास्तव्य करणारे आदिवासी मुहाच्या बीयांचे तेल गाळण्यासाठी सध्या शहापूर शहरातील गिरणीवंर दाखल झाले आहेत.
शहापूर तालुक्यातील वासिंद ,खर्डी ,डोळखांब ,किन्हवली ,कसारा या दुर्गम भागात वास्तव्य करणारे आदिवासी उन्हाळ्याच्या मोसमात दाट जंगलात रानो ,रान भटकंती करुन मोठ्या मेहनतीने मुहाची फळं गोळा करुन आणतात नंतर त्यातील बीया काढून या बीया उन्हाळ्यात सुखवितात एका प्लास्टिकच्या पिशवीत व टोपल्या मध्ये किंवा डब्यांमध्येन साठवून या बीयांपासून खाद्यातेल गाळले जाते तेल गाळण्यासाठी आदिवासी महिला पुरुष तेल गाळणाऱ्या गिरणीत येतात हे तेल आम्ही विक्री न करता वर्षभर अन्नपदार्थ बनविण्यासाठी खाद्यतेल म्हणून वापरात आणतो असे गोदीबाई कुवरे व सिता खांजोडे या आदिवासी महिलांनी माहिती देताना सांगितले सध्या दिवसभर मुहाच्या बीयांपासून तेल गाळण्यासाठी शहापूर शहरातील प्रसिद्ध अशा प्रकाश जगे यांच्या जगे चक्कीवर आदिवासींची एकच झुंबड उडाली आहे येथील गिरणीतील तेलाच्या घाण्यावर दिवसभरात रोज ७० ते ८० लिटर तेल गाळले जाते आहे मुहाच्या बीयांनी भरलेला एक डब्बा तेल गाळण्यासाठी २० रुपये असा अल्प दर आकरला जातो असे गिरणी कामगार रविंद्र हरड यांनी बोलताना सांगितले तेलाच्या घाण्यावर मुहाचे (मोठ्याचे )तेल गाळण्यासाठी पावसाळ्यातील ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत आदिवासींची अशीच गर्दी पाहण्यास मिळेल असे गिरणी चालकांकडून सांगितले जात आहे.
0 टिप्पण्या