Trending

6/recent/ticker-posts

शासन निर्णय धाब्यावर बसविणाऱ्या संस्थाचालकावर कठोर कारवाई करावी - मनविसे

शासन निर्णय धाब्यावर बसविणाऱ्या संस्थाचालकावर कठोर कारवाई करावी - मनविसेठाणे


जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू या आजाराला जागतिक महामारी घोषित केले आहे. काही शाळा व्यवस्थापनांन कडून सध्या राज्यात लोकडॉउन असल्याने ऑनलाइन शिक्षण दिले जाते आहे. ठाणे शहरातील ज्युनिअर केजी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याना कोणतेही शिक्षण न देता फी मागितली जात आहे, शाळा चालवण्यासाठी शिक्षकाच्या पगारासाठी विद्यार्थ्यांकडून फी घेणे आवश्यक आहे याची आम्हास जाणीव आहे. शासन निर्णयानुसार ऑनलाईन फी भरण्याचा पर्याय दिला जातो आहे. परंतु शासन निर्णयाप्रमाणेच शैक्षणिक सुविधांचा वापर केला जात नसल्यामुळे मुलांची फी पालकांच्या कार्याकारी समिती मार्फत ठराव करुन कमी करण्याचा अटीकडे सोयीकर पणे दुर्लक्ष केले जात आहे. सर्व शाळा व्यवस्थापकांना पालकांच्या परिस्थितिचा सहानूभूतीपूर्वक विचार करण्यास सांगण्याची गरज आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे आलेल्या पालकांच्या तक्रारी बाबत तत्काळ संबंधितांना फी संदर्भात शासन नियमांचे पालन करण्यास बंधनकारक करावे व शासन निर्णयाला धाब्यावर बसविणाऱ्या संस्थाचालकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष किरण पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.


 


Post a Comment

0 Comments