Trending

6/recent/ticker-posts

नेपाळला शत्रु बनविण्याचे धोरण 

नेपाळला शत्रु बनविण्याचे धोरण दिनेश भट्टाराइ हे नेपाळच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र धोरणासंबंधी सल्लागार आहेत.तसेच युएन मधील राजदूत आहेत. त्यांचा ‘इंडियन एक्सप्रेस’ मधे (१० जून) लेख आला आहे.


नेपाळने लिंपियाधुरा ,कालापानी,लिपुलेख हे भारताच्या ताब्यात असलेले भाग  नविन नकाशात नेपाळ चे भाग म्हणून दाखवले आहेत. ऑगस्टमधे नरेंद्र मोदींनी नेपाळ ला भेट दिली तेव्हा तत्कालीन पंतप्रधान सुशिल कोईराला यांनी या भागांसंबंधीचा विवाद त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. मे 2015 मधे मोदी चीनला गेले. तेव्हा लिपु लेख पास मधून व्यापार करण्यासंदर्भात दोन्ही देशांत सहमती झाली. तेव्हा देखील नेपाळने  लिपु लेखच्या संदर्भात आक्षेप नोंदवला होता. सप्टेंबर 2015 मधे नेपाळने नविन राज्यघटना जारी केल्यानंतर भारताने सीमेवर ब्लॉकेड केला ज्यामुळे जीवनावश्यक व इतर गोष्टी नेपाळमधे पोचू शकल्या नाहीत. परिणामी नेपाळमधील 2017 ची निवडणूक 'भारतविरोधी' मुद्द्यावर झाली. भारताच्या लष्कर प्रमुखांनी नेपाळची भूमिका चीनच्या आदेशावर आधारित आहे असा आरोप केला. यामुळे नेपाळी लोकांचा अपमान झाला आहे! 


सीमाप्रश्नावर तोडगा न काढल्यास ही छोटी वाटणारी गोष्ट immense competition (तीव्र स्पर्धा) आणि Intense Rivalry (कडवे वैर) मधे परावर्तित होण्याची शक्यता आहे. त्याचा दूरगामी भूराजकीय परिणाम होईल (far reaching geo political implications). ही भारताताला दिलेली स्वच्छ आणि स्पष्ट वार्निंग आहे! आणि ती नेपाळ च्या उच्चस्तरीय प्रतिनिधिने दिली आहे हे आवर्जून लक्षात घ्यायला हवे .2014 मधे नेपाळच्या संविधान सभेमधे  मोदींनी 'नेपाळ खुश नसेल तर भारत कसा खुश राहिल ?' असे विधान केले होते.याची आठवन करुन देत, भट्टाराइ म्हणतात की नेपाळ खुश नाही, आणि तरीही त्या संदर्भात भारताकडून उपाय शोधणारा संवाद सुरु करण्यात आलेला नाही. हे 'neighbourhood first' / शेजारी प्रथम धोरण नव्हे अशी कानउघड़नी त्यांनी केली आहे!  याचा अर्थ असा की आता नेपाळ जो नकाशा प्रसिद्ध केला आहे ती अचानक केलेली कृती नाही. 
गेले 6 वर्षे मोदींना त्यांनी वेळोवेळी आपली भूमिका सांगितली होती.  पण मोदींनी त्याच्यावर तोडगा काढला नाही किंवा त्या दृष्टीने संवाद ही सुरु केला नाही उलट नेपाळवर अनावश्यक दादागिरी त्यांनी केली.


देशांतर्गत राजकीय विरोधकांबाबत ते ज्या प्रकारची दादागिरी करतात तोच एप्रोच त्यांनी नेपाळबाबतही ठेवला. 
किंवा कदाचित जगभर हिंडन्याच्या आणि भाषणबाजी करण्याच्या नादात त्यांनी छोट्या  शेजाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. चीन भारताची कोंडी करू पाहत असताना आपला जवळचा मित्र शत्रुपक्षात ढकलण्याचे धोरण मोदींनी अवलंबीले आहे! चाणक्य यांना फ़क्त फोटोपुरता हवा आहे बाकी यांचे वर्तन चाणक्यनिति विरोधी असेच आहे. याची किंमत मात्र देशाला मोजावी लागणार आहे! 


भाऊसाहेब आजबे 


https://www.facebook.com/111300717195314/posts/143584873966898/?d=n


Post a Comment

0 Comments