Trending

6/recent/ticker-posts

गरजू कलावंताना माजी नगरसेवक रमेश कांबळे यांची मदत

गरजू कलावंताना माजी नगरसेवक रमेश कांबळे यांची मदत


मुंबई


कोरोना व्हायरस कोव्हिड १९ या दुर्धर महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर घर चालवणाऱ्या हाडाच्या कलाकारांसाठी सढळ हस्ते मदत करत त्याना दिड महिना पुरेल इतक्या प्रमाणात उत्कृष्ट राशनचे वाटप करण्यात आले.  ज्यात ५ किलो तांदूळ, ५ किलो गव्हाचे पीठ, १ किलो साखर, १ किलो डाळ, १ लिटर तेल, मसाला व हळद पॅकेट इतक्या शिधेचा समावेश होता, राजकारणासह समाजकार्याचे बाळकडू प्राप्त झालेले चेंबूरचे माजी नगरसेवक मा. रमेश कांबळे याच्याद्वारे केले गेलेल्या स्तुत्य उपक्रमामुळे सर्वजण त्यांचे कौतुक करत आहेत.


 आजवर महाराष्ट्रातील मुबंई, ठाणे, कल्याण, नाशिक, सोलापूर, नगर, पुणे, औरंगाबाद अश्या कानाकोपऱ्यात  सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करीत स्वतः राशन किटचे वाटप घरपोच केले त्यानी सुरू केलेल्या या मदतकार्यात आजवर त्यानी २५०० गोरगरीब गायक, वादक, कलाकार, नकलाकार, जादूगार, नाटककार, सिने वर्कर्स यांना घरपोच राशन किट वाटप केले आहे. त्यांच्या या कार्याचा लाभ घेणाऱ्या कलावंतानी त्यांचे आभार कोणत्या शब्दात मांडू हेच कळत नसल्याचे उद्गार व्यक्त केले असले. सध्या ते जस जमेल तशी मदत गरजूंना करत आहेत त्यासोबतच विभागात जंतुनाशक फवारणी, फूड पॅकेट वाटप, मोफत मास्क वितरण अश्या प्रकारची सामाजिक कामे ही ते करत आहेत. त्याना सदर कामांसाठी प्रेरणा केवळ त्यांच्या मनात समाजाप्रति असलेल्या सदभावनेमुळे मिळते असे मत त्यांनी "प्रजासत्ताक जनता" जवळ व्यक्त केले.


 



 


Post a Comment

0 Comments