शहापूर आदिवासी प्रकल्प  कार्यालयाच्या वतीने कामगारांना मदत 


शहापूर 


आदिवासी विकास विभाग शहापूर एकात्मिक आदिवासी विकास यांच्या वतीने लॉक डाऊनमुळे ठाणे जिल्हयातील विविध भागात अडकलेल्या मजूर व कामगारांना त्यांच्या स्वतःच्या मुळगावी जाण्यासाठी कल्याण ते शहादा येथील २२ प्रवाशांना तर भाईंदर (मिरारोड ) ते अक्कलकुवा येथील २३ प्रवाशांना अशा एकूण ४५ प्रवाशांना आपल्या गावी पाठविण्यासाठी शहापूर प्रकल्प  कार्यालयाने  मदत केली समाजाप्रती आपली एक सामजीक बांधिलकी म्हणून शहापूर आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुणकुमार जाधव यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला होता शहापूर प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंंद व सहकाऱ्यांनी मिळून कामगारांना सदर प्रवासा दरम्यान  प्रकल्प कार्यालयाच्या वतीने प्रवास खर्च ,जेवण ,पाणी आदी मदत करण्यात आली शहापूर प्रकल्प कार्यालयाने दिलेल्या या अमुल्य अशा सेवेबद्दल  सर्व आदिवासी मजूरांनी व कामगारांनी प्रकल्प अधिकारी अरुणकुमार जाधव यांचे खास आभार मानले .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या