कोरोना महामारीतही सफाई कामगारांना सुरक्षा साधनांची प्रतिक्षा

कोरोना महामारीतही सफाई कामगारांना सुरक्षा साधनांची प्रतिक्षा

 


 

कल्याण

 

कोरोना महामारीत सर्वच महापालिका कामगार, कर्मचारी- अधिकारी आपले जीव धोक्यात घालून काम करत आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कामगार देखील शहरातील कचरा गोळा करून डम्पिंग ग्राऊंडवर नेतात. या कामगारांना कोरोना महामारीत Covid 19 नुसार प्रमाणित सुरक्षा साधनांची पूर्तता करण्याची प्रतिक्षा अजुनही कामगार करीत आहेत. याबाबत पूर्वीही निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले आहे. मात्र त्याची पूर्तता न करता उलट घनकचरा विभागाचे काही अधिकारी कामगारांना सुरक्षिततेची साधने न पुरवता कामगारांच्या आरोग्याशी खेळून औद्योगिक कलह निर्माण करीत असल्याचा आरोप श्रमिक जनता संघाने केला आहे.  याबाबत कल्याण डोंबिवली महापालिकाचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांना संघाचे सरचिटणीस जगदिश खैरालिया यांनी पत्राद्वारे कळविले आहे. 
 


 

कल्याण डोंबिवली महापालिकेने घरातील कचरा संकलन करताना सूका व ओला कचरा वेगवेगळ्या कप्प्यात संकलन करण्याची व्यवस्था वापरल्या जाणाऱ्या घंटागाडी अथवा अन्य वाहनांची संरचनेत केली आहे का ? तशी व्यवस्था केली नसल्यास कामगारांनी हे काम करायचे तरी कसे ? त्यामुळे प्रशासनाने सुप्रीम कोर्टाचे निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन बाबतीत ठरलेल्या धोरणानुसार घंटागाडी व इतर व्यवस्था प्रथम निर्माण करावी. सध्याचे उपलब्ध साधनांचे वापर करून कामगार सर्व विभागातील कचरा गाडीत भरून डम्पिंग ग्राऊंडवर नेतात. आपले अधिकारी सफाई कामगारांना गाडीत भरलेला सूका व ओला कचरा वेगळा करण्यासाठी आदेश देतांना कामगारांच्या आरोग्याची काळजी सुध्दा कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने घ्यायला हवी. व कोरोना महामारी लक्षात घेऊन तशी सुरक्षा साधने आणि कामाच्या ठिकाणी लागणारे स्वाथ्यवर्धक आवश्यक गोष्टींची पूर्तता आगोदरच करायला हवी.आरोग्यास घातक असलेले कामाबाबत कामगारांना प्रशिक्षण देण्यात यावे.

 

कल्याण डोंबिवली परिसरात राहणारे नागरिकांना आवाहन करुन घराघरातून ओला कचरा वेगळा आणि सूका कचरा वेगळा केला गेल्यास या प्रश्नावर सोपा मार्ग निघू शकतो. मात्र यासाठी घंटागाडी व कचरा गोळा करण्यासाठी वापरले जाणारे वाहन देखील तांत्रिक, कचरा व्यवस्थापन धोरणात बसणारे पुरविण्यात यावे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या प्रमाणात सेवेत असलेले कायम आणि कंत्राटी सफाई कामगारांची संख्या अपुरी आहे. याचा विचार करून कल्याण डोंबिवली परिसरात विना मोबदला कचरा वेचून उदरनिर्वाह करणारे कचरा वेचकांना महापालिकेने योग्य मोबदला निर्धारित करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिल्यास बरीचशी व्यवस्था होऊ शकते.

 

याबरोबरच कामगार कायद्याच्या तरतुदी नुसार कामाच्या ठिकाणी पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय करावी. तसेच स्नानगृह, प्रसाधनगृह, कैंटीन, पुरेसा प्रमाणात साबण, टावेल, सेनिटायझर, प्रमाणित प्रतीचे मास्क, हैंडग्लोव्ज, गमबूट, व कचर्यातील संसर्गापासून बचावासाठी आवश्यक सुरक्षा किट उपलब्ध करून द्यावी. कचरा वर्गीकरण करण्यासाठी लागणारे आवश्यक वाहने आणि सुरक्षेसाठी साधने उपलब्ध करून दिल्या शिवाय कामगारांना आरोग्यासाठी धोकादायक कामे सांगून नये. आपल्याकडून कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल, कामगार कायदे व औद्योगिक कलह कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकारी यांना देण्यात यावे, अशी मागणी जनता श्रमिक संघाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad