उरण ते नवी मुंबई  अत्यावश्यक सेवेसाठी बंद झालेली NMMT सेवा पुन्हा सुरु

उरण ते नवी मुंबई  अत्यावश्यक सेवेसाठी बंद झालेली NMMT सेवा पुन्हा सुरु


उरण मधील पत्रकार विट्ठल ममताबादे यांच्या पाठ पुराव्याला यश.


 प्रवाशी वर्गाने मानले प्रशासनाचे आभार.


अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी यांनी मानले ममताबादे यांचे आभार.उरण


उरण मधून नवी मुंबईमध्ये गेलेले कर्मचारी अचानक बस बंद झाल्याने नवी मुंबई मध्येच अडकुन होते. त्यांची राहण्याचे व जेवनाचे खूप मोठे हाल झाले त्यांना परत उरण मध्ये येता येत नव्हते. ही सर्व समस्या पत्रकार विठ्ठल ममताबादे यांनी नवी मुंबई महानगरपालिकाचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, NMMTचे मॅनेजर शिरीष आधारवड यांच्या नजरे समोर आणून दिली.  नवी मुंबई ते उरण, उरण ते नवी मुंबई बस अत्यावश्यक सेवेतील कामगार वर्गांसाठी सुरु करावी अशी विनंती केली होती. लॉक डाऊन, संचारबंदी तसेच अत्यावश्यक सेवेचे महत्व लक्षात घेवून नवी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ व NMMT चे मॅनेजर शिरीष आधारवड यांनी ११ मे पासून NMMT ची बस सेवा सुरु केली. त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे उरण मधील पत्रकार विट्ठल ममताबादे, उरणचे अत्यावश्यक सेवेतील सर्व अधिकारी कर्मचारी वर्गांनी  अण्णासाहेब मिसाळ, शिरीष आधारवड यांचे मनोमन आभार मानले.


करोना रोगाच्या पार्श्वभुमीवर लॉक डाऊन व संचारबंदीचे नियम लक्षात घेता नवी मुंबई ते उरण NMMT बसेस फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांसाठी साठी सुरु केले होते. यामध्ये डॉक्टर, नर्स, सुरक्षा रक्षक, सफाई कामगार, पोलिस,हॉस्पिटल कर्मचारी यांनाच प्रवास करण्याची मुभा होती. मात्र अन्य कंपनीचे, इतर सेवेतील कर्मचारी देखील या बस मध्ये परवानगी नसताना चढत होते त्यामुळे अनेकदा कंडक्टर(वाहक) व ड्रायवर(चालक)यांच्यात वादविवाद झाले. त्यांचे प्रकरण दररोज वरिष्टां पर्यंत जाउ लागले.शिवाय उरण मार्गावरिल प्रवासी सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याने तसेच या उरण ते नवी मुंबई मार्गावर अनेक प्रवाशी वर्ग कंडक्टर व ड्रायवर सोबत सतत वाद घालत असल्याने ८ मे पासून नवी मुंबई मधून उरण व उरण मधून नवी मुंबई कडे जाणाऱ्या सर्व NMMT बसेस बंद करण्यात आले होते. यामुळे उरण मधील अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी वर्गांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागले होते. अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, नर्स, पोलिस, सफाई कामगार, हॉस्पिटल कर्मचारी यांना नवी मुंबई मध्ये जान्यासाठी व नवी मुंबई मधून परत येण्यासाठी दूसरा कोणताच पर्याय उपलब्ध नव्हता. मात्र शुक्रवार पासून NMMT बस बंद असल्याने आवश्यक सेवेतील कर्मचारी कामावर जाऊ शकले नाही.


बसमध्ये प्रवाशी वर्गाने नेहमी सोशल डिस्टन्सिंग पाळावे,कंडक्टर, ड्रायवर यांच्याशी वाद घालू नये. सर्व प्रवाशी वर्गाने शांततेने प्रवास करावा. विनाकारन NNMT विरोधात तक्रार करु नये असे आवाहन NMNT चे मॅनेजर शिरीष आधारवड यांनी प्रवाशी वर्गांना केले आहे.तसेच आता फक्त हॉस्पिटलमधील अधिकारी कर्मचारी वर्ग, डॉक्टर, नर्स यांनाच प्रवासाची मुभा असेल इतरांना प्रवास करण्याची मुभा, परवानगी नसेल असेही शिरीष आधारवड यांनी बस सुरु करण्यापूर्वी स्पष्ठ केले. दरम्यान सुरवाती पासून NMMT बस सुरु करण्यासाठी उरण मधील पत्रकार विठ्ठल ममताबादे यांच्यासह त्यांच्या प्रवाशी मित्र वर्गाच्या पाठ पुराव्याला यश आल्याने अत्यावश्यक सेवेतील सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाने ममताबादे यांचेही आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad