Top Post Ad

गोव्यात रेल्वेने जाणाऱ्यांची सक्तीने सशुल्क कोरोना टेस्ट

गोव्यात रेल्वेने जाणाऱयांची सक्तीने सशुल्क कोरोना टेस्ट!
 राज्य सरकारचा जालीम उपाय 



मुंबई


रुग्णांची संख्या गुणाकाराच्या पटीत वाढून कोरोनाशी सुरू असलेली लढाई पुढील काळात बिकट होईल, असा धोक्याचा गंभीर इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिला असतानाच गोवा सरकारने बाहेरून रेल्वेने येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाकडून 2 हजार रुपये मेडिकल चेक अप चार्जेस वसूल करत त्यांची कोरोना टेस्ट घेणे सुरू केले आहे. 'ग्रीन झोन' मध्ये असलेल्या गोव्यात कोरोनाच्या फैलावाला चाप लावण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. दिल्लीहून विविध राज्यांत जाणाऱ्या निवडक रेल्वे गाड्या केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. त्यातील पहिली गाडी  मे रोजी पनवेल मार्गे मडगाव येथे पोहोचली. त्याच दिवसापासून गोवा सरकारने रेल्वेतून बाहेरून येणाऱ्या सर्वच प्रवाशांना सशुल्क कोरोना तपासणी सक्तीची केली आहे.


या तपासणीत कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येणाऱ्या प्रवाशांवर प्रतिदिन 2 हजार 500 रुपये हॉस्पिटल चार्जेस आकारून त्यांना सरळ रुग्णालयात धाडले जात आहे. तर, कोरोना टेस्ट निगेटीव्ह येणाऱ्या प्रवाशांना दोन आठवडे होम कोरांन्टाईन केले जात आहे. दिल्ली- मडगाव या पहिल्या रेल्वे गाडीतून आलेल्या दिल्ली, मुंबईच्या शेकडो प्रवाशांना मडगाव स्टेशनात उतरताच फटूर्डा स्टेडियम येथे तपासणीसाठी नेले होते. तिथे त्या प्रवाशांची तब्बल आठ तास वैद्यकीय तपासणी चालली. त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाना मंडगावच्या सरकारी रुग्णालयात धाडले गेले. तर, उरलेल्या प्रवाशांना 14 दिवस होम कोरांन्टाईन करण्यात आले.


गोवा हे राज्य कोरोना मुक्त असल्याने ग्रीन झोनमध्ये येते. रेल्वे गाड्या हळू हळू सुरू होऊ लागल्या आहेत. त्यामुळे पर्यटन आणि व्यापारासाठी बाहेरील लोकांचा ओघ पुन्हा वाढण्याच्या मार्गावर आहे. त्यातून आपल्या राज्यालाही कोरोनाचा विळखा पडू नये, यासाठी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची सशुल्क कोरोना टेस्ट तेथील सरकारने सक्तीची केली आहे. या टेस्टमध्ये प्रवाशी निगेटिव्ह निघाले तरी 14 दिवस त्यांना होम कोरांन्टाईन व्हावे लागते आहे. त्या प्रवाशांना विनाकारण दोन आठवडे गोव्यात अडकून पडावे लागत असल्याने वास्तव्यासाठी हॉटेल्सच्या खर्चाचा भुर्दंड त्यांना बसू लागला आहे. त्यामुळे गोव्याकडे येणाऱ्या गर्दीला सक्तीच्या सशुल्क कोरोना टेस्टमुळे हमखास चाप बसेल, असा गोवा सरकारचा होरा आहे.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com