Trending

6/recent/ticker-posts

रमाई आंबेडकरांना ऑनलाइन   काव्य फुलांनी अभिवादन 
रमाई आंबेडकरांना ऑनलाइन   काव्य फुलांनी अभिवादन 

 


 

ठाणे 

 

कोरोना  विषाणूच्या  संसर्गाला  आळा घालण्यासाठी सध्या पूर्ण देश लॉकडाऊन  आहे. म्हणून सरकारी नियमांचे पालन करीत  रमाई आंबेडकर यांच्या ८५  व्या  स्मृती दिनानिमित्त मुंबईयुनी स्कुल आॕफ थाॕट्स, हर्षवर्धन फाऊंडेशन,आणि असोशिएशन फोर सोशल ईक्वीटी  यांच्या संयुक्त विद्यमाने रमाई आंबेडकर यांना  झूम ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन कविता सादर करत रमाई आंबेडकर  यांना  ऑनलाइन  काव्य फुलांनी विविध कवींनी  अभिवादन केले. या कार्यक्रमाचे आयोजन   प्रशांत भालेराव यांनी केले असून  प्रा.डॉ.विद्यानंद खंडागळे, प्रा. सतीश सिरसाट, किरण गांगुर्डे, प्रशांत तायडे, संदीप भांगरे, प्रा. प्रफुल भोसले, डॉ मंगेश सावंत, किशोर मोरे यांचे सहकार्य लाभले. तर सहभागी कवींचे  स्वागत  प्रा संदीप कदम यांनी तर  आभार   प्रफुल्ल सावंत यांनी केले.

 

सदर ऑनलाइन  कवी संमेलनात  वैभवी अडसूळ , दीक्षा कदम, चरण जाधव,अनिल साबळे,  मिलिंद जाधव, सत्यजीत कोसंबी, प्रज्ञाकिरण वाघमारे, उत्तम भगत  यांनी रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर कविता सादर करीत प्रबोधन केले. तर आंबेडकरी चळवळ आणि स्ञी या विषयावर डाॕं. सुवर्णा मोरे यांनी आंबेडकरी स्ञीवादी भुमिका, जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले.आंबेडकरी चळवळीची लिंगवादी राजकारणाची जबाबदारी, मुक्तीवादी अवकाश निर्माण करण्याची गरज आज आहे असे देखील मोरे  म्हणाल्या.

 

 


 

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या