धारावीतील स्थलांतरीत मजुरांची परवड

धारावीतील स्थलांतरीत मजुरांची परवड


मुंबईटाळेबंदीच्या तिसरा सत्रांमध्ये जिल्ह्याबाहेर जाऊ पाहणाऱ्या व्यक्तीकरिता मुभा देण्यात आली असल्याने आपली वैद्यकीय तपासणी करून घेण्यासाठी परप्रांतीय नागरिकांची परवड होत आहे. शासकीय धोरणानुसार परप्रांतीय मजूर व इतरांना आपापल्या राज्यात जाणेकरिता परवानगी देण्यात आली आहे.  मात्र त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे. विशेष म्हणजे या दाखल्यांच्या आधारे आपल्याला इतर जिल्ह्यांमध्ये प्रवास करणे शक्य होईल असा भाबडा समज अनेक  नागरिकांमध्ये आहे.


धारावीतील डॉ. अनिल पाचणेकर आणि डॉ. मनोज जैन यांच्या दवाखान्याबाहेर मजुरांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, या मजुरांकडून प्रत्येकी अनुक्रमे रू. २५० व रू. २०० आकारून, विना तपासणी वैद्यकीय सर्टिफिकेट दिले जात आहे. यावेळी सोशल डिस्टंसिंगच्या नियमाकडे साफ दुर्लक्ष केल्या गेल्याचं दिसून आलं. स्थलांतरीत मजूर अन्नाला मौताद असताना त्यांची अशाप्रकारे केली जाणारी लूट आणि परवड कृपया शक्य तितक्या लवकर थांबवण्याची व्यवस्था करावी . अशी मागणी धारावी पुनर्विकास समितीचे अध्यक्ष अॅड.राजेंद्र कोरडे यांनी केली आहे.


स्थानिक पोलीस ठाण्यात या कामी एक फॉर्म भरून देणे आवश्यक आहे. धारावी पोलीस ठाण्यात २५ मजुरांनी एकत्रित फॉर्म भरून दिल्याशिवाय तो स्वीकारला जात नाही, तसेच या मजुरांनी स्वतःच प्रवासाकरिताच्या बसची सोय करावी, असे सांगितले जात आहे.  एकीकडे टाळेबंदीत अडकलेल्या परप्रांतीय व इतर जिल्ह्यातील नागरिकांची संख्या मोठी असल्याने या सर्वांची वैद्यकीय तपासणी  करून घेण्यासाठी एकच गर्दी झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad