नव्या दिशानिर्देशांत केंद्राचा भर फक्त कंटेनमेंट झाेनवर, संसर्ग थांबवण्यासाठी कडक निर्बंध
नवी दिल्ली.
राज्य एक जूनपासून शाळा, धार्मिक स्थळे आणि रेस्तराँ सुरू करणे किंवा मेट्रो रेल्वे सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ शकतात. मात्र, या सर्व ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क आणि आरोग्य सेतू अॅप अनिवार्य केले जाऊ शकतात. कंटेनमेंट झोनमध्येच निर्बंध राहतील. मात्र, केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह देशभरातील मॉल आणि थिएटर बंद ठेवण्याचे आदेश देऊ शकते. अधिकाऱ्यांच्या मते, दर १५ दिवसांनी लॉकडाऊनचा आढावा घेतला जाईल. यात स्थानिक परिस्थितीनुसार राज्य निर्णय घेईल. नव्या दिशानिर्देशांत केंद्राचा भर फक्त कंटेनमेंट झाेनवर राहू शकतो. येथील संसर्ग थांबवण्यासाठी कडक निर्बंध लागू केले जातील. सध्या ३० महानगरपालिका क्षेत्रात देशभरातील ८०% हून जास्त रुग्ण आहेत. यापैकी १३ शहरांतील अधिकाऱ्यांसोबत कॅबिनेट सचिवांची बैठक झाली होती. एक जूनपासून कोणती वसाहत, कॉलनी, गल्ली, वॉर्ड किवा पोलिस ठाणे क्षेत्र कंटेनमेंट जाहीर करायचे हे महापालिका ठरवेल. अशी माहीती सुत्रांकडून मिळत आहे.
देशात ६८ दिवसांच्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा रविवारी संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यात शुक्रवारी झालेल्या बैठकीत लॉकडाऊन ४.० नंतरच्या धोरणाबाबत चर्चा झाली. शहा यांनी मुख्यमंत्र्यांकडून आलेल्या सूचना पंतप्रधानांना सागितल्या. अधिकाऱ्यांच्या मते, एक जूननंतर लॉकडाऊन दोन आठवडे वाढण्याची शक्यता आहे. मात्र, या वेळी निर्बंध निश्चितीत केंद्राची भूमिका मर्यादित राहील. सवलतीत वाढ करणे, त्या कमी करण्याचे अधिकार पूर्णत: राज्यांना मिळू शकतात. शाह यांनी गुरुवारी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत लॉकडाउन वाढण्याबाबत चर्चा केली होती. यानंतर सर्व मुख्यमंत्र्यांचे मत शाह यांनी पंतप्रधानांना सांगितले. सरकार 31 मे रोजी संपणाऱ्या चौथ्या लॉकडाउला सध्या असलेल्या नियम व अटीसोबत आणकी 15 दिवस वाढवू शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक राज्य लॉकडाउन वाढवण्याच्या बाजुने आहेत.
देशात लॉकडाउनची चौथी फेज १८ मे रोजी सुरू झाली होत, ती आता ३० मे रोजी संपणार आहे. या चौथ्या फेजमध्ये मोठी सूट दिली होती. पहिल्यांदाचा कँटॉन्मेट झोन व्यतिर्कीत दुकाने आणि बाजार उघडण्याची परवानगी दिली होती. या दरम्यान सरकारने 25 मे पासून देशांतर्गत उड्डाणे सुरू केली. एका लोकेशन बेस्ड अॅपच्या सर्वेमधून समोर आले आहे की, 300 जिल्ह्यातील 2.5 लाख लोकांमधील 86% लोकांननी सांगितले की, लॉकडाउनची तिसरी फेज संपल्यानंतरही त्यांना बाहेर जाऊन खाता-पिता आले नाही. चौथ्या फेजमध्ये दिलेल्या सवलतीमुळे 60% लोक नाखुश आहेत. 49% लोकांमध्ये कोरोनाची भीती आहे. 11% लोकांचे म्हणने आहे की, देशातील संक्रमितांची संख्या पाच लाखांच्या पुढे जाऊ शकते.
पुढच्या महिन्यात पावसाळी साथ आजार सुरू होतील. त्याची लक्षणे आणि कोविड-१९ ची लक्षणे एकच आहेत. त्यामुळे लाॅकडाऊन एकदम उठवला तर परिस्थिती बिघडण्याची शक्यता असल्याचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संपादकांच्या बैठकीत केला. त्यामुळे ३१ मेनंतर राज्याच्या काही भागात लाॅकडाऊन ५ लागू करावा लागणार आहे, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. लाॅकडाऊन ५ मध्ये सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू असावी, असे राज्य सरकारचे मत आहे. तसे केंद्राला कळवले आहे. लोकलच्या काही फेऱ्या तरी सुरू करणे आवश्यक असल्याचे ठाकरे म्हणाले.
0 टिप्पण्या