शहापूरातील कोरोना ग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील  ११ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

शहापूरातील कोरोना ग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील  ११ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह


शहापूर


शहापुरातील एका कोरोनाबाधित रुग्णाशी संपर्क आला म्हणून विलगीकरण कक्षात ठेवलेल्या सर्व ११ जणांचे अहवाल बुधवारी निगेटिव्ह आल्याची माहिती शहापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ तरुलता धानके यांनी दिली आरोग्य विभागाच्या या दिलासादायक बातमीने शहापूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 


गेल्या आठवड्यात शहापुर शहरातील एक ६७ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले दरम्यान या घटनेने तालुक्यात खळबळ माजली होती. खबरदारी म्हणून या कोराना बाधीत रुग्णाच्या संपर्कातील ११ जणांना आरोग्य प्रशासनाने तातडीने क्वारंनटाईन केले असून त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती यांत ११ जणांचे रिपोर्ट हे निगेटीव्ह आल्याचे आरोग्य विभागाच्या सुत्रांनी माहिती देतांना बुधवारी सांगितले


कोरोना बाधीत व्यक्तीचा रहिवास असलेल्या परिसरातील व मुख्य बाजारपेठेतील रस्ते बॅरिकेड्स लावून सील करण्यात आले आहेत.तर शहापुर शहर परिसरामध्ये वैद्यकीय अधिकारी तरुलता धानके यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य  विभागाच्या विविध पथकांमार्फत दैनंदिन आरोग्य तपासणी करुन सर्वे  करण्यात येत आहे .तथापि ११ जणांचे रिपोर्ट जरी निगेटिव्ह आले असले तरी त्या सर्व जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून आरोग्य विभाग त्यांची रोज १४ दिवस दैनंदिन तपासणी करण्यात असल्याचे सांगण्यात येत आहे .टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad