"टाईम स्केअर" हॉटेल पूर्णपणे डॉक्टर व आरोग्य खात्यातील लोकांना राहण्यासाठी- सलाम शेख
ठाणे -
सध्या महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या युद्धजन्य परिस्थितीत कोरोनाग्रस्तांची सेवा करणारे डॉक्टर,नर्स तसेच वाॅर्डबॉय अशा एकूणच आरोग्य विभागाचे नियोजन पाहणारे आरोग्य विभागातील अधिकारी हे खऱ्या अर्थांनी देवदूत म्हणून काम करत आहेत.कोरोनाग्रस्तांची सेवा करणाऱ्या तसेच आरोग्य खात्यातील महत्वाच्या व्यक्तीची राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून सलाम शेख यांनी स्वतःचे हॉटेल प्रशासनाला वापरासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाण्यातील जांभळी नाका रोडवरील आपले "टाईम स्केअर" हे हॉटेल पूर्णपणे डॉक्टर व आरोग्य खात्यातील लोकांना राहण्यासाठी देण्यात आले असल्याची माहिती सलाम शेख यांनी दिली
मुंबई महाराष्ट्रासह ठाणे, पालघर जिल्ह्यात कोरोना पेशंटची संख्या वाढत आहे. आरोग्य सेवेतील डॉक्टर नर्स व इतर अधिकारी हे दिवस रात्र काम करीत आहेत. पेशंट वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवरील ताणही वाढत आहे. जे कोरोनाग्रस्तांची सेवा करतात त्यांची चांगली सोय व्हावी यासाठी सलाम शेख यांनी हे पाऊल उचलले आहे यावरच शेख थांबले नाही त्यांचे मुंबई मधील हॉटेल देखील त्यानी या डॉक्टर,नर्स यांन करीता दिले आहे तसेच त्यांच्या मुंबई बजेट असोसिएशन चे अध्यक्ष अशरब अली यांनी मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोन वर चर्चा करून मुंबईतील तब्बल 70 हॉटेल या डॉक्टर व नर्स यांच्या करीता उपलब्ध करून दिली आहे यामध्ये देखील शेख यांचे 2 हॉटेल असल्याचे शेख यांनी सांगितले
सलाम शेख यांचे ठाणे जांभळी नाका येथील "टाईम स्केअर" या हॉटेल मध्ये राहण्यासाठी 30 रूम असून हे हॉटेल आरोग्य विभागासाठी आपण देण्याचा निर्णय घेतला. ठाणे शहरातील कोरोनाग्रस्तांची सेवा करणारे डॉक्टर व आरोग्य विभागातील व्यक्ती यांना राहण्यासाठी हे हॉटेल पूर्णपणे विनामूल्य देत असल्याचे सलाम शेख यांनी सांगितले आहे कोरोनाचा खातमा होईपर्यंत हे हाॅटेल रूग्णसेवकांसाठी उपलब्ध आहे, असेही त्यांनी सांगितले
0 टिप्पण्या