बेकायदेशीर बैठक, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

सोसायटीच्या कार्यकारिणीच्या गणगोताची माहिती पोलिसांना कळविल्याने वकील महिलेला मारझोड


बेकायदेशीर बैठक घेण्यात नगरसेविकेचा पती होता आघाडीवर, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू


पनवेल:


लॉकडाउन आणि संचारबंदी आदेशाला फाट्यावर मारून काल नवीन पनवेल येथील विंचूबेमधील जीवनधारा सोसायटीत कार्यकारणी सदस्य व वीस रहिवाशांनी गैररित्या बैठक घेतली. त्याची माहिती पोलिसात कळवली म्हणून त्याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या वकील महिलेला आज २० एप्रिल रोजी  सकाळी मारझोड करण्यात आली आहे. याबाबत खांदेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
या सोसायटीचे अध्यक्ष नगरसेविकेचे पती असून त्यांनीच पुढाकार घेऊन काल बैठक बौलविली होती. असे वकील महिलेचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिस कुणा कुणावर गुन्हा दाखल करतात, याकडे लक्ष लागले आहे. काल दुपारनंतर सोसायटीच्या व्हाट्ट्सअप समूहावर त्या वकील महिलेला ट्रोल केले होते. आज तर चक्क तीला एका महिलेने मारहाण केली आहे. मारहाण करणाऱ्या महिलेला कुणी फूस दिली याचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्याम शिंदे करीत आहेत.
आजच्या या प्रकरणामुळे नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबाला झाले तरी काय असा प्रश्न पनवेलकर विचारत आहेत. दरम्यान, एका सामजिक कार्यकर्त्याच्या मदतीने वकील महिलेने पोलिसांना ही माहिती दिली.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad