महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नागरिकांना मोबाईल क्लिनिक सुविधा

 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नागरिकांना मोबाईल क्लिनिक सुविधा


अधिकाधिक लोकांपर्यंत सुविधा पुरवू - मोहन जोशी


पुणे


सध्याच्या काळात विविध भागात आरोग्यसेवा पुरवण्यासाठी मोबाईल क्लिनिक सुविधा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र आणि बीजेएस यांच्या वतीने सुरू करण्यात येत असून त्याचे उदघाटन इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र चे अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांच्या हस्ते आज १७ एप्रिल रोजी सकाळी मंगळवार पेठ, कडबाकुट्टी येथे करण्यात आले.


रुग्णाला केसपेपर देऊन सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपक्रमाचे संयोजक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आणि माजी आमदार मोहन जोशी, महाराष्ट्र विद्यार्थी मंडळाचे सचिव डॉ.विकास आबनावे, काँग्रेस ओबीसी आघाडीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत सुरसे, इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे च्या अध्यक्ष डॉ.आरती निमकर, उपाध्यक्ष डॉ.संजय पाटील, असोसिएशनचे सेक्रेटरी डॉ.सुनील इंगळे, माजी अध्यक्ष डॉ.हिलरी रॉड्रिक्स, डॉ.आशुतोष जपे, डॉ.राजन संचेती आदी मान्यवर उपस्थित होते.



सध्याच्या वातावरणात किरकोळ आजाराकडेही लोकांनी दुर्लक्ष करु नये, वैद्यकीय सल्ल्याने उपचार करून घ्यावेत. अशा उपचारांच्या दृष्टीने मोबाईल क्लिनिक उपयुक्त आहे. पुण्यानंतर महाराष्ट्रात इतरत्रही मोबाईल क्लिनिक सुरू केले जाईल असे डॉ.भोंडवे यांनी यावेळी बोलताना सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण सर्वजणंच लढत आहोत. डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ जोखीम घेऊन कर्तव्य बजावत आहेत. त्यांना आपण सहकार्य करायला हवे. असे आवाहन मोहन जोशी यांनी केले. वैद्यकीय तज्ज्ञांमार्फत दिल्या जाणाऱ्या मोबाईल क्लिनिक सुविधा स्थानिक पातळीवर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असून त्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते सक्रीय राहातील.या उपक्रमात विजय वारभुवन, मनोज पिल्ले, सचिन वाघमारे, संकेत चव्हाण, शुभम कदम, आकाश वैरागे आदी कार्यकत्यांचा सहभाग आहे.



मोबाईल क्लिनिक माध्यमाद्वारे देण्यात येणारी रुग्ण सेवा-सुविधा  शहराच्या वेगवेगळ्या भागात रोज उपलब्ध राहील. या मोबाईल क्लिनिकमध्ये पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट वापरणारे दोन एमबीबीएस आणि एमडी डॉक्टर असतील. ते रुग्णांची तपासणी करुन त्यांच्याकडे उपलब्ध असणारी औषधे देतील. सोशल डिस्टन्सचा नियम पाळून रुग्णांना सेवा दिली जाणार आहे.



 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad