बांधकाम मजुरांना प्रत्येकी २ हजार रुपये मदतीच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत - मोहन जोशी.
मुंबई,
कोरोना विषाणुच्या संकटात सर्व कामधंदे बंद असल्याने इतर मजुरांप्रमाणे बांधकाम मजुरांचीही उपासमार होत होती याचा विचार करुन नोंदणीकृत बांधकाम मजुरांना प्रत्येकी २ हजार रूपये त्यांच्या खात्यात थेट जमा करण्याचा निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व माजी आमदार मोहन यांनी स्वागत केले आहे.
जोशी पुढे म्हणाले की, सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत चांगला असून सध्या या मुजरांच्या हाताला कसलेच काम नसल्यामुळे त्यांची परिस्थीती बिकट झाली होती. १० एप्रिल रोजी मी सरकारकडे या बांधकाम मजुरांना प्रत्येकी १० हजार रुपये देण्याची मागणी केली होती. सरकारने सध्या तातडीची मदत म्हणून दोन हजार रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात या अडचणीत असलेल्या वर्गाला आणखी मदत करावी ही काँग्रेस पक्षाची मागणी.
गरीब मजूरांना न्याय दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मोहन जोशी यांनी आभार मानले आहेत.
0 टिप्पण्या