अत्यावश्यक वस्तूंच्या सुलभ वितरणासाठी ईपेलेटरची झिपग्रिडसह भागीदारी
मुंबई
डिजिटल क्रेडिट स्पेसमधील प्रख्यात इनोव्हेटर असलेल्या ईपेलेटरने झिपग्रिड या तंत्रज्ञान प्रणित सर्व्हिस प्रोव्हायडरशी भागीदारी केली आहे. या भागीदारीतून उदयास आलेले झिपमार्ट हे घरोघरी आवश्यक वस्तू वितरीत करण्यासाठी वचनबद्ध आहे. साथीच्या आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी ऑनलाइन ऑर्डरद्वारे मागवलेल्या वस्तूंची कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरी निवडक निवासी सोसायट्यांमध्ये करणे, हा या उपक्रमामागील हेतू आहे. ही सेवा आता कार्यान्वित झाली असून मुंबई आणि एनसीआरमधील झिपग्रिडमध्ये नोंदणीकृत सर्व निवासी सोसायटीसाठी उपलब्ध आहे.
झिपमार्ट हे ईपेलेटरच्या भागीदारीतून स्टोअर्समधील खाद्यपदार्थ आणि इतर आवश्यक वस्तूंचे वर्गीकरण करते. ईपेलेटर आणि झिपग्रिडच्या एकत्रित कॉमर्स अॅक्टिव्हिटिजमुळे ग्राहकांना घरातूनच सुरक्षितरित्या वस्तूंची ऑर्डर करता येते. तसेच संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी डिजिटल पेमेंटची सुविधाही देण्यात आली आहे. झिपग्रिडवरील नोंदणीकृत हौसिंग सोसायटी, बिल्डिंग हे झिपपमार्ट टॅबअंतर्गत झिपग्रिड अॅपवरील ईपेलेटरवरील ऑनलाइन पोर्टलवर किराणाची ऑर्डर देऊ शकतात. ही सेवा अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्म या दोन्हीवर उपलब्ध आहे. एकदा ऑर्डर प्लेस केल्यानंतर ग्राहकांना सरकारी आदेशानुसार सर्व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करत एक्झिक्युटिव्हद्वारे ग्राहकांच्या दारात वस्तू आणून दिल्या जातात.
ईपेलेटरचे सहसंस्थापक उदय सोमयजुला म्हणाले, ‘ग्राहकांनी सुरक्षित वातावरणात म्हणजेच त्यांच्या घरातून आवश्यक वस्तूंची ऑर्डर द्यावी आणि आम्हही त्यांना दारापर्यंत ती पोहोचतती करावी, हा या संयुक्त भागीदारीमागील हेतू आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी तसेच समाजाला अधिक सक्षम करण्यात योगदान देण्यासाठी आम्ही ही भागीदारी केली आहे.’
0 टिप्पण्या