तानसा अभयारण्यात भेकराची शिकार करणाऱ्यांना अटक



 तानसा अभयारण्यात भेकराची शिकार करणाऱ्यांना अटक

 


 

शहापूर 

 

लाॅगडाऊनच्या काळात वन्यजीव गुन्हांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये वन्यजीव शिकारीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. शहापूर तालुक्यामधील तानसा वनपरिक्षेत्रातील वेहलोंढे परिसरातील डोगर शेत येथे भेकराच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आले. वन विभागाने तानसा अभयारण्यात शुक्रवारी भेकराची शिकार करणाऱ्या शिकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याजवळून एक मृत भेकर जप्त करण्यात आले आहे. वनाधिकारी आरोपींची चौकशी करत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२४ एप्रिल रोजी मिळालेल्या गुप्त माहीतीवरून ठाणे उपवनसंरक्षक अर्जुन पा.म्हसे, ज.का.स. शहापुर तानसा अभयारण्य सहा.वनसंरक्षक    डी.एल.मते यांचे मार्गदर्शनाने तानसा वन्यजीव वनक्षेत्रपाल आर. एन. चन्ने, वेहलोंढे वनपाल संजय भालेराव तसेच इतर परिमंडळ कर्मचाऱ्यांसह सापळा रचून परिमंडळ वेहलोंडा  मधील डोगर शेत येथे वन्यजीवांची शिकार झाली होती. त्या ठिकाणी तपासणी केली असता. आरोपी  विष्णू गोपाळ गावित (३७) राहणार डिभे-अघई, शंकर कोडू साराई (४५) राहणार टहारपूर, अक्षय शंकर साराई (२०) राहणार टहारपूर या तीनही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी ठेवलेल्या पांढऱ्या प्लास्टिकच्या गोणी मध्ये  भेकर नर (Barking  Deer) हा प्राणी मृत अवस्थेत  रक्ताने  माखलेल्या  स्वरूपात मिळून आला असता आरोपींना अटक करण्यात आली.  मयत नर भेकरास   वन्यजीवांचे पशु वैद्यकीय अधिकारी वाडा यांनी पोस्ट मॉर्टम केले. वरिष्ठांच्या आदेशानुसार  भेकराचे दहन करण्यात आले. 

 भारतीय वनअधिनियम १९२७चे कलाम २६(१)  (ड),(आय), ६१ (अ) वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलाम ९, ३९, ३९(ड),४८ (ए)व ५१ महाराष्ट्र वननियमावली २०१४ मधील कलम ९(ब ),(क),(इ),(ग) अन्वये शुक्रवारी वनपरिक्षेत्र तानसा येथे गुन्हा नोंद केला आहे.  आरोपींना न्यायदंडाधिकारी शहापूर येथे हजर केले असता. न्यायालयाने सोमवार (दि.२७) पर्यंत तीनही आरोपींना  पोलीस/फॉरेस्ट कस्टडी दिली असून पुढील तपास चालू आहे. अशी माहिती तानसा वन्यजीव वनक्षेत्रपाल आर. एन. चन्ने यांनी दिली आहे. 



 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad