अत्यावश्यक वस्तूंच्या स्थानिक वितरण व्यवस्थेत शिपरॉकेटचा प्रवेश

अत्यावश्यक वस्तूंच्या स्थानिक वितरण व्यवस्थेत शिपरॉकेटचा प्रवेश


मुंबई


देशभरात ३ मेपर्यंत वाढवलेल्या लॉकडाउनचा निर्णय लक्षात घेऊन तंत्रज्ञान समर्थित लॉजिस्टिक अग्रीगेटर असलेल्या शिपरॉकेटने अत्यावश्यक वस्तूंच्या अतिस्थानिक (हायपरलोकल) वितरण सेवेत प्रवेश केला आहे. नव्याने सुरू झालेल्या या सेवेद्वारे हा ब्रँड ई कॉमर्स कंपन्यांना अन्न, किराणा सामान आणि औषधविषयक साहित्य ८ किलोमीटरच्या परिसरात पोहोचवण्यासाठी मदत करेल. यासाठी शॅडोफॅक्स या डिलिव्हरी पार्टनरच्या तज्ञांची मदत घेतली जाईल. ही नवी सेवा भारतातील मुंबई, पुणे, अहमदाबाद, दिल्ली, जयपूर, फरीदाबाद, नोयडा, गुरुग्राम आदी एकूण १४ महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरू झाली आहे.


या भागीदारीद्वारे, शिपरॉकेट हे अनुभवी स्थानिक वितरकांच्या माध्यमातून अत्यावश्यक उत्पदनांचे विनाअडथळा वितरण करू शकेल. या सेवेचा लाभ घेत हा ब्रँड ग्राहकांपर्यंत थेट पोहोचून एक किंवा दोन दिवसात ग्राहकांना सामान पोहोचवू शकेल. या वितरण व्यवस्थेत आकार किंवा वजनाचे कोणतेही बंधन नसेल, रिटर्नसाठी ज्यादा शुल्क नसेल, के‌वळ ७९ रुपये प्रति ५ किलोमीटर या माफक शुल्कात संबंधित वस्तूचे वितरण केले जाईल.


शिपरॉकेटचे सीईओ आणि सहसंस्थापक   साहिल गोएल म्हणाले, ‘शिपरॉकेट हायपरलोकल ग्राहकांना त्यांचे सामान त्याच दिवशी किंवा दुस-या दिवशी मिळण्याची हमी देईल. यासाठी शॅडोफॅक्सच्या अनुभवी डिलिव्हरी एजंट्सची मदत घेतली जाईल. सध्याच्या अनिश्चित आणि अनपेक्षित काळात विक्रेत्यांना वेगाने वितरण करण्यास, ग्राहकांना या सेवेचा उत्तम अनुभव देण्यास तसेच फायदेशीर व्यवसायात सातत्य राखण्यासाठी या वितरण सेवेचा उपयोग होईल.’टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA