Top Post Ad

ठाणे पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या आवारात भरोसा सेल कार्यान्वीत 

ठाणे पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या आवारात भरोसा सेल कार्यान्वीत 



ठाणे
ठाण्याचे पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या आवारात ९ मार्च रोजी भरोसा सेल सुरू करण्यात आले आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाच्या महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभागाच्या आदेशानुसार याची सुरुवात झाली आहे.  या वेळी सह आयुक्तांसह गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त दीपक देवराज, सहायक पोलीस आयुक्त किसन गवळी, सुनील बाजारे,आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संजय जाधव, पद्मजा चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी, सई लेले, अंजली भालेराव, कल्पना मोरे आदी या वेळी उपस्थित होते.  या सेल अंतर्गत पती-पत्नीमधील कौटुंबिक वादामध्ये समुपदेशन केले जाते. त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणा या बडी कॉप (पोलीस ठाण्याच्या स्तरावर नोकरदार महिलांना संकटकाळी तत्काळ मदत), शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस काका, पोलीस दीदी तसेच वुमन हेल्प डेस्कद्वारे पोलीस ठाण्यात येणा या महिलांच्या तक्रारींचे समुपदेशन, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी ज्येष्ठ नागरिक कक्ष आणि छेडछाड करणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी दामिनी पथक आदी वेगवेगळ्या योजना या सेलद्वारे राबविण्यात येणार आहेत. 
स्पेशल ज्युवेनाईल कोर्ट प्रोटेक्शन युनिट अंतर्गत लहान मुलांच्या अपहरणाची प्रकरणे, बालमजुरी, बेवारस मुलांच्या पालकांचा शोध घेणे, भिक्षा मागणारे आणि अनैतिक मानवी वाहतुकीमध्ये अडकलेल्या मुलांचा शोध आदी कम्युनिटी पोलिसिंग स्किम जून २०१९ मध्ये लागू झाली. त्यानंतर भरोसा सेलमध्ये या योजना समाविष्ट करून त्या सर्व योजनांचे कामकाज या सेलमार्फतीने पाहिले जाते. वाद सोडविण्यासाठी सकारात्मक उपयोग- मेखला भरोसा सेल मार्फत कौटुंबिक वादातून विकोपाला जाणारी पती-पत्नीमधील भांडणे सोडविण्यासाठी सामाजिक संस्थांमार्फतही प्रयत्न केले जाणार आहेत. या सेलचा संकटातील नोकरदार महिलांनाही चांगल्या प्रकारे उपयोग होणार असल्याचा विश्वास मेखला यांनी व्यक्त केला.या सेलमध्ये येवून समस्या मांडल्यास नक्कीच सोडवली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com