Trending

6/recent/ticker-posts

कळव्यातील अतिशय जुने वडाच्या झाडाला आग

कळव्यातील अतिशय जुने वडाच्या झाडाला आग : घातपाताची शक्यता ?ठाणे 
पारसिक कळवा खारीगांव येथील अनेक दशके जुने वडाचे वृक्ष आज दिनांक ६मार्च 2020 रोजी सायंकाळी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुदैवाने अग्निशमन केंद्राकडून त्वरित आग विजवण्यासाठी मदत झाली. सध्या ते झाड ७०% जळालेल्या अवस्थेत आहे. ठाणे महानगर पालिका वृक्ष प्राधिकरणाला विनंती आहे त्यांनी त्वरित त्या वृक्षाचे परीक्षण करून काही घातपात आहे का याची चौकशी करून ते झाड वाचवण्यासाठी कारवाई आणि कार्यवाहि करावी. हे झाड वाचवण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात यावी. पारसिक डोंगरावर घोलाई नगर , भास्कर नगर येथे सुद्धा वृक्ष कापून झोपडया बांधण्यात येत आहेत तसेच काही अधिकारी सिमेंट टाकून वन जमीनिवर वृक्षांना हानी पोचवत आहेत त्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते  सिद्धेश देसाई यांनी केली आहे. 
ठाण्यात आजही छुप्या मार्गाने प्रचंड प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत आहे. या वृक्षतोडीकडे ठाणे महानगर पालिका जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी बेमालुमपणे ही वृक्षतोड सुरु आहे. तरी अशा प्रकारची छुपी वृक्षतोड शहरात कोठेही सुरू नाही, असा दावा महापालिका प्रशासन करत आहे. . शहरातील काही भागांमध्ये वृक्षांवर विषप्रयोग होत असून काही ठिकाणी तोडलेले वृक्ष पुरावा नष्ट करण्यासाठी जाळले जात आहेत, त्यापैकीच हा प्रकार नाही ना याची चौकशी करण्याची मागणी कळव्यातील नागरिकांनी केली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या