Trending

6/recent/ticker-posts

 84 हजार भारतीयांसाठी एक बेड, तर, 36 हजारांसाठी एक क्वारंटाईन बेड 

 84 हजार भारतीयांसाठी एक बेड, तर, 36 हजारांसाठी एक क्वारंटाईन बेड 


नवी दिल्ली
कोरोनाने सध्या साऱ्या जगात धुमशान घातले आहे. भारतातही मोठ्या वेगाने हा विषाणू पसरत आहे. भारतात कोरोना दुसऱ्या टप्प्यात असला तरी, देशात 300हून अधिक रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. या सगळ्यात केंद्रीय आरोग्य विभागाचा एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये सध्या रुग्णालयांमध्ये 84 हजार भारतीयांसाठी एक बेड, तर, 36 हजार भारतीयांसाठी एक क्वारंटाईन बेड आहे. कोरोनाव्हायरसने थैमान घातल्यानंतर सरकारच्या वतीने ही आकडेवारी गोळा करण्यात आली. काही राज्यांमध्ये तर 11 हजार 600 भारतीयांसाठी एकच डॉक्टर असणार आहे.
आरोग्य तज्ज्ञांचे मते, या आकडेवारीवरून कोरोनाला दूर ठेवणे जास्त महत्त्वाचे आहे असे दिसत आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सामाजिक अंतर दूर करण्यासाठी केलेले आवाहन आणि जनता कर्फ्यूची या गोष्टी पाळल्या पाहिजे. भारताच्या सार्वजनिक आरोग्याच्या पायाभूत सुविधांवरील भार कमी करण्याची जबाबदारी सामान्य लोकांवर आहे.
ICMRचे संचालक अनुराग अग्रवाल यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत, “भारत सध्या दुसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळं या टप्प्यात सामाजिक अंतर ठेवणे हा एकमेव उपाय आहे. तर, स्टेज 3ला लॉकडाउन आवश्यक आहे. लोकांनी सध्या स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. जनता कर्फ्यू हे भविष्यासाठी चांगली पद्धत आहे. सध्याच्या आकडेवारीच्या आधारे सरकार योग्य कार्य करीत असल्याचे दिसते", असे सांगितले.
...तर भारताची अवस्था इटली किंवा चीन सारखी होईल
कोरोनाव्हायरसच्या प्रसाराबाबत अभ्यास करणाऱ्या दोन शास्त्रज्ञांनी न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत अशी भीती व्यक्त केली आहे. यापैकी एक वैज्ञानिक हे सरकारसोबत काम करत आहेत. वैज्ञानिक म्हणाले, भारताने एका कठीण टप्प्यात प्रवेश केलेला आहे. अशावेळी भारताबाबत 2 परिस्थिती समोर आहेत. एक तर Social Distancing आणि (Self Quarantine करून चीनप्रमाणे आजाराच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरेल आणि तसं नाही झालं तर इटलीसारखी परिस्थिती होईल आणि देशाची आरोग्यव्यवस्थाच कोलमडेल. त्यामुळे 2 ते 3 आठवडे भारतासाठी महत्त्वाचे आहेत. भारतात पुढील 2 ते 3 आठवडे कोरोनाव्हायरसची प्रकरणं 415 ते 1000 या दरम्यान जाऊ शकतात, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.


Post a Comment

0 Comments