Trending

6/recent/ticker-posts

ठाणे महापौर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस

ठाणे महापौर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र पोलीसठाणे:
 ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या  अंतिम स्पर्धेत पुरूष गटात महाराष्ट्र पोलीस संघ तर  महिला गटात ठाणे महापालिकेच्या संघांनी विजेतेपद पटकाविले. महापालिकेच्यावतीने विजेत्या पुरूष व महिला संघांला प्रत्येकी 1 लाख रुपयांचे रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह देवून महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली  मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर, पोलीस आयुकत विवेक फणसळकर व उपस्थीत  मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
            यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र फाटक उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते अशोक वैती, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, वागळे प्रभाग समिती अध्यक्षा ‍शिल्पा वाघ, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा नम्रता पमनानी, शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, नगरसेवक योगेश जानकर, नगरसेविका  आशा डोंगरे,  परिषा सरनाईक, अनिता गौरी, मंगल कळंबे, नगरसेविका मीनल संख्ये, वृक्ष प्राधिकरण सदस्या नम्रता भोसले, परिवहन सदस्य जेरी डेव्हीड, पोलीस आयुकत विवेक फणसळकर,  उपायुक्त संदीप माळवी,  अशोक बुरपल्ले, सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे,  राष्ट्रीय खेळाडू अशोक शिंदे  जिम्नॅस्टीक मधील ‍शिवछत्रपती पुरस्काराने प्राप्त पूजा सुर्वे, वर्तकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त पंकज शिरसाट,  पोलीस निरीक्षक प्रीती चव्हाण, तहसीलदार सत्यजीत चव्हाण आदी उपस्थीत होते.
गेली चार दिवस ठाणेकरांना कबड्डीचा थरार अनुभवायला मिळाला. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात ही स्पर्धा पार पडली.या स्पर्धेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थीती लावून या स्पर्धेचा आनंद लुटला व स्पर्धकांना प्रोत्साहित केले.व्यावसायिक पुरूष संघात दवितीय पारितोषिक  एअर इंडिया यांनी पटकाविले असून त्यांना रोख रक्क्म 75 हजार रुपये, सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. उपउपान्त्य  विजयी महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, भारत पेट्रोलियम यांनी पटकाविले असून त्यांना रोख रककम 30 हजार, सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. मालिकेत एअर इंडिया संघांतील उमेश म्हात्रे यांनी उत्कृष्ट खेळाडू, महाराष्ट्र पोलीस संघातील बाजीराव घोडके यांनी  उत्कृष्ट् पकड चे पारितोषिक पटकाविले. मालीकेत उदयोन्मुख खेळाडूचा  ‍किताब ठाणे महानगरपालिका संघातील अक्षय भोईर यांनी तर  मालिकावीर मधील उत्कृष्ट खेळाडूचे रोख रक्ककम 21 हजार रुपयांचे पारितोषिक महाराष्ट्र पोलीस संघातील नितीन थळे यांनी पटकाविले.
महिला व्यावसायिक गटात व्दीतीय पारितोषिक बँक ऑफ बरोदा यांनी पटकाविले असून त्यांनोख रक्कम 75,000/- सन्मानचिन्‌ह देवून सन्मानित करण्यात आले. उपउपान्त्य  विजयी एमरल्ड द इनफ्रास्ट्रक्चर व  बालवडकर पाटील वेंचर्स  यांनी पटकाविले असून त्यांना रोख रककम 30 हजार, सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट् पकड चे पारितोषिक बँक ऑफ बरोदाच्या साक्षी रहाटे यांनी पटकाविले. मालीकेत उदयोन्मुख खेळाडूचा ‍किताब लेयर टेक्नॉलॉजी संघातील ज्याती पवार यांनी तर  मालिकावीर मधील उत्कृष्ट खेळाडूचे रोख रक्ककम 21 हजार रुपयांचे पारितोषिक ठाणे महानगरपालिका संघातील कोमल देवकर  यांनी पटकाविले.


Post a Comment

0 Comments