Trending

6/recent/ticker-posts

 ठाणे महापौर चषक कबड्डी स्पर्धेचे महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते  शानदार उद्घाटन

 ठाणे महापौर चषक कबड्डी  स्पर्धेचे महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते  शानदार उद्घाटनठाणे, :


कबड्डी हा महाराष्ट्राच्या लाल मातीतला खेळ आहे,  या खेळाने महाराष्ट्रातील अनेक खेळाडूंना नावलौकिक दिला. आज महाराष्ट्रातील हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचला असून या खेळाला प्रोत्साहन देवून नवे खेळाडू घडविण्याचे व या खेळाची परंपरा जोपासण्याचे काम ठाणे महापालिका करीत असल्याचे सांगत महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्धाटन झाल्याचे जाहीर केले. . कबड्डीचा हा थरार 9 फेब्रुवारीपर्यत चालणार असून दररोज नागरिकांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थीत रहावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.
            ठाण्यातील परबवाडी मैदान, मेंटल हॉस्पीटल येथे ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे गुरूवारी (06 फेब्रुवारी) उद्घाटन झाले. यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी  पक्ष नेत्या  प्रमिला केणी, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती अमर पाटील,  शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, स्थानिक नगरसेवक  व शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, नगरसेविका मीनल संख्ये, वृक्षप्राधिकरण सदस्या नम्रता भोसले, माजी उपममहापौर रमाकांत मढवी, उपायुक्त संदीप माळवी, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस ‍ निरीक्षक पठाण, आदींसह क्रीडा विभागाचे कर्मचारी उपस्थीत होते.
            


Post a Comment

0 Comments