भारतीय मराठा महासंघाच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी
ठाणे
भारतीय मराठा महासंघाच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी
ठाणे
शिवजयंतीनिमित्त भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शासकीय विश्रामगृह ते मासुंदा तलाव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.त्यानंतर तलाव परिसरात असलेल्या शिवरायांच्या अश्वरुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या रॅलीत शाळेतील विद्यार्थी,महिलावर्गाने उत्स्फुर्तपणे सहभाग घेतल्यामुळे संपुर्ण वातावरण शिवमय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय...जय भवानी जय शिवराय...अशा घोषणा देत आज भारतीय मराठा महासंघाच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डाँ.आप्पासाहेब आहे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बन्सीदादा डोके, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पी.जी.पवार,राष्ट्रीय सरचिटणीस राम शिंदे,राष्ट्रीय सचिव राजेंद्र जगदाळे,जिल्हाप्रमुख किशोर पवार, दिलीप चव्हाण,अशोक साळवी,अविनाश साळवी,प्रदिप मोरे, सुरेश कदम, रविंद्र चव्हाण, अमित कदम, अमित नाईक, विपूल माने आदींसह अनेक ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
शिवशंभु प्रतिष्ठानच्यावतीने मोफत पाणी वाटप
शिवशंभु प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीनिमित्त ठाण्यातील सकाळी नितीन कंपनी ते तलाव पाळी बाईक रॅली काढण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या दर्शनासाठी येणार्या शिवभक्तांना शिवशंभु प्रतिष्ठानच्यावतीने तलावपाळी येथे मोफत पाणी वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सत्यवान जाधव, पत्रकार अजय जाधव, समीर थोरवे, गणेश खैरे सुरज जाधव इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
राष्ट्रवादीने साजरी केली जल्लोषात शिवजयंती
छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याचे ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय आणि मासुंदा तलाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रचंड जल्लोषात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी झाली. यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई , महिला अध्यक्ष सौ. सुजाताताई घाग आणि महिला कार्याध्यक्षा सौ. सुरेखा ताई पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले.
ठाणे महानगरपालिकेत शिवजंयती साजरी
ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी, 2020 रोजी 'छत्रपती शिवाजी महाराज जयंती' निमित्ताने महापालिकेच्या कै.नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मा.महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर सौ.पल्लवी पवन कदम, अतिरिक्त आयुक्त (2) समीर उन्हाळे, उपआयुक्त संदीप माळवी व महापालिका कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
शिवजयंती निमित्ताने ठाण्यात शिवकालीन नाण्यांचे प्रदर्शन
महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कोपरी येथे ठाणे काँग्रेसच्यावतीने शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते यामध्ये दुर्मिळ नाणी नोटा पोस्टर पोस्टाची तिकिटे हस्तलिखिते दुर्मिळ वस्तू तोफांचे गोळे शिवकालीन शस्त्रास्त्रे अशा विविध मौल्यवान वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोपरी ब्लॉकचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीप्रित्यर्थ ठाणे पुर्व आनंद सिनेमानजीक शिवतीर्थ ग्रुपच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात दुर्मिळ नाणी, नोटा, पोस्टाची तिकिटे, हस्तलिखिते, दुर्मिळ वस्तू, तांब्या-पितळ्याच्या व इतर धातुंच्या मूर्ती, परदेशी चलनातील नोटा व नाणी, टोकन, बॅच, शिवकालीन शस्त्रास्त्रे, अस्त्रे असा मौल्यवान खजिना, तितक्याच निगुतीने मांडलेले त्याचे प्रदर्शन, प्रत्येक स्टॉलवर त्याची माहिती देण्यास सरसावणारे इतिहासप्रेमी अभ्यासक, आजवर पुस्तकात अभ्यासलेले इतिहासकालीन नाणी, नोटांचे होत असलेले प्रत्यक्ष दर्शन यामुळे पाहायला मिळाले. यामध्ये सुमारे ५०० पुरातन नाण्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाप्रसंगी करण्यात आलेल्या तुलेतील दुर्मिळ 'सुवर्णहोन'देखील प्रदर्शित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचा शुभारंभ करिता सन्माननीय जिल्हाध्यक्ष मनोज शिंदे साहेब यांनी शिवपुतळा पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व तसेच कार्यक्रमाचे आयोजक श्रीकृष्ण भुजबळ ब्लॉक अध्यक्ष ठाणे यांनी केले होते. या कार्यक्रमाला , माजी परिवहन सदस्य भालचंद्र महाडिक, माजी नगरसेवक सुरेश जाधव, रमेश पाटील, महेंद्र म्हात्रे, बाबा शिंदे, ज्ञानबा पाटील, नाना कदम, राम तपकीर, मनोज जाधव संजय यादव शेख भाई गोविंद शर्मा नीलेश अहिरे योगेश महेकर आदी मान्यवर उपस्थित होते
0 टिप्पण्या